Skip to content

Baramati

real estate since 1995

Menu
Menu

पाऊस नाही आला, पण शब्दांचा वर्षाव झाला

Posted on July 18, 2025July 18, 2025 by Satyajett

भगिनी मंडळाने पाऊसावरच्या कविता सादर केल्या

बारामतीमधले तमाम रसिकांमुळे मला सांस्कृतिक परिवार मिळाला आहे. कोल्हापूरवरून बारामतीला आल्यावर माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे होते. वाचन करणारे आणि विचारांचा संच करणारी मंडळी इथे आहे, याचा फार आनंद आहे.

आज भगिनी मंडळाने आयोजित केलेल्या पावसावरील कवितांचा कार्यक्रम अनुभवला. खूप साधा आणि तेवढाच गोड, हा कवितांचा वर्षाव होता. “ये रे ये रे पावसा” म्हणत परत लहान होऊन पावसामध्ये धिंगाणा घालावासा वाटला, परत प्रेमात पडून चिंब पावसाने ओलं व्हावंसं वाटलं, आणि प्रेमभंग होणे हा मानवी जीवनाच्या रस्त्यावरचं एक आठवणीतलं वळण असतं; कृष्ण ढगाला असलेला एक सोनेरी काठ. उन्हपावसाचा खेळ मांडणारा हा प्रयोग कायम लक्षात राहील.

माझ्या आई आणि भगिनी मंडळ परिवार

प्रत्येक माणसाचा पाऊस वेगळा असतो. प्रत्येक माणसाला आपल्या खिडकीतून दिसणारा पाऊस वेगळा असतो. पण पावसात भिजायचं असेल तर आपली चौकट सोडून भरून आलेल्या आकाशाखाली उभं राहावं लागतं. प्रत्येकाचा पाऊस वेगळा असला तरी, ते भिजणं मात्र एक असतं. कधी कवीच्या लेखणीतली शाही बनतो, तर कधी डोळ्यात उभा राहतो. सृजनशीलतेला निसर्ग उभारा देतो, आणि निसर्गाला उभारा — हा पाऊस.

विशेष म्हणजे, आपण पावसावर ऐकलेली गाणी कवितेच्या रूपात ऐकायला मिळाली. संगीत शृंगार असेल तर बोल हे गाण्याचा आत्मा असतो. आज आत्मा कसा दिसतो, हे अनुभवलं. डॉ. रेवती संत, डॉ. रंजना नेमाडे आणि डॉ. अपर्णा पवार यांनी खूप अभ्यासपूर्वक आणि आपुलकीने “पाऊस” या विषयावरच्या कविता सादर केल्या.

कल्पना दुधाळ जी आणि हनुमंत चांदगुडे जी हे माझ्या इतर ग्रुपमधले आणि समकालीन महत्त्वाचे कवी. हनुमंतजींची पाऊस नसतो कुणीच मित्र बहिरा आणि मुका, आणि कल्पनाजींच्या बाप झाला पावसाळा या कवितांचा आजच्या कार्यक्रमात समावेश होता. त्याचबरोबर कवी ग्रेस यांच्या पाऊस कधीचा पडतो आणि आई या कविता एक सुखद धक्का म्हणून समोर आल्या.

स्टेज वर कवितांचा पाऊस पडत असताना कॉफीचा आनंद घेतला.

______________

सत्यजित साळोखे
बारामती
८३७९९०५१५१

बारामती, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती द्यायची असल्यास मला WhatsApp करा. कामातून सवड मिळाली तर नक्की येईन. 🙂

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पाऊस नाही आला, पण शब्दांचा वर्षाव झाला
  • कीर्तावनी ऐकताना सुकून अनुभवाला
  • गीत तुझे स्मरताना, शतजन्म शोधताना -माननीय खासदार सुनेत्राताई पवार मंत्रमुग्ध झाल्या
  • डॉ. राहुल देशपांडे ज्ञानोबांची वारी घेऊन आजोळी आले
  • माळरान बारामतीचे दैवत – डॉ. महेश गायकवाड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2025
  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
© 2025 Baramati | Powered by Superbs Personal Blog theme