एनव्हॉरमेंटल फोरम ऑफ इंडिया चे सगळेच प्रोग्रॅम मस्त असतात
माननीय खासदार सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शन खाली; प्रतिबिंब अंतर्गत घेतला गेलेला – “गीत तुझे स्मरताना – शतजन्म शोधताना” या कार्यक्रमाला जाण्याचा योग्य आला. एनव्हॉरमेंटल फोरम ऑफ इंडिया चे सगळेच प्रोग्रॅम मस्त असतात.
मागे भगिनी मंडळाच्या – “माउलींनी समाधीसाठी पांढरी का निवडली” या विषयी व्याख्यानाला गेलो होतो तेव्हा एक विचार सतत मनामध्ये घुटमळत होता. की ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ, चोख मेळा, होनाजी बाळा सारखे संत कवी आता हयात असते तर त्यांनी उपलब्ध माध्यमांचा वापर कसा केला असता? त्यांचे Instagram आणि YouTube accounts असते का? संत वाङ्मय नाही पण मराठी चित्रपट गीतांचा काय झाले असते ते शतजन्म शोधताना अनुभवले.
सातारा, कोल्हापूर, सांगली, मिरज अश्या अनेक गावांमधून बुद्धीजीवी आणि सृजन कलाकार आपली माती आणि रक्त घेऊन मुंबई-पुण्याला अली. ती माती, ते रक्त त्यांच्या घामात मिसळलं आणि मराठी चित्रपट सांगितलं आत्मा मिळाला. हा आत्मा खूप साधा पण मोठा आहे. याला छाप आहे संत संस्कृतीची, आणि हा आत्मा मानवी जीवनाचे किनारे धरून वाहतो. यात माणसाने माणसासाठी लिहिलेले शब्द वाहतात.
श्रीनिवास खळे यांनी मराठी संगीताचं आधुनिकीकरण केले. पण तांत्रिक आधुनिकीकरणाच्या जगात जर ही दिग्गज मंडळी वावरली असती तर त्यानी संगीत रचना (Music Arangement) कशी केली असती, या कल्पनेवर आधारित “शतजन्म शोधताना” का कार्यक्रम आहे. यात सुधारीकरणाचा अविर्भाव नाही, तर आपल्या मराठी लेखणीचा आणि संगीताचं साधेपणा अजून गोड करण्याचा प्रयत्न वाटला.

देवेंद्र भोमे यांच्या सोबत टिपलेले छायाचित्र
“गीत तुझे स्मरताना – शतजन्म शोधताना” हा मराठी गीतांचा खूप बोलका कार्यक्रम आहे. देवेंद्र भोमे यांच्या कल्पनेतून उतरलेल्या हा कार्यक्रम स्पृहा जोशी यांचे सूत्रसंचालन धरून ठेवतो. मराठी कवी, गीतकार आणि संगीतकार यांच्या जीवनातले अनेक किसे स्पृहाताई सांगतात. या गप्पागोष्टींमुळे जुनी मराठी गाणी अजूनच ओळखीची वाटू लागतात.
खास म्हणजे, या कार्यक्रमाला माननीय खासदार सुनेत्राताई पवार उपस्थित होत्या. विशेष म्हणजे हा कार्यक्रम ते दुसऱ्यांदा बघत होत्या आणि त्या शेवट पर्यंत कार्यक्रमाला थांबल्या. हे दुर्मिळ आहे. शक्यतो नेते मंडळी नमस्कार-चमत्कार करून निघून जातात. ही कालेसाठी असलेली एका नेत्याची आपुलकी कौतुकास्पद आहे.

आदरणीय सुनेत्राताई पवार आणि माझ्या आई सुमनताई साळोखे ज्यांच्यामुळे मला फोरमच्या कार्यक्रमांना जायला मिळते.
गीतांची यादी आणि किस्याची कहाणी सांगणे मी हेतुपरस्कर टाळतो आहे. कारण हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी अनुभवावा अशी माझी इच्छा आहे.
आपल्या मराठी साहित्यिकांनी, कवी-गीतकारांनी आणि संगीतकारांनी जे काम करून ठेवले आहे, ते आत्मसात करण्यासाठी नक्कीच शतजन्म देखील कमी पडतील. त्यांच्या कामातून स्फूर्ती घेऊन, त्यांच्या खांद्यावर उभे राहून अनेक लाकडे कलाकार उभारी घेत आहेत, हे पाहून फार आनंद झाला. कार्यक्रमातील सगळीच गायक मंडळी ताकदीची होती.
सत्यजित साळोखे
बारामती
८३७९९०५१५१
बारामती, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती द्यायची असल्यास मला WhatsApp करा. कामातून सवड मिळाली तर नक्की येईन. 🙂